पुणे
बिबट्याची दहशत कायम, हल्ले सुरूच
पुणे, ता. १६ : जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यासह जिल्ह्यात बिबट्याची जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. रोज कोठे ना कोठे दर्शन आणि पाळीव प्राण्यांचा फडशा ठरलेलाच आहे. तर आता दिवसाढवळ्याही थेट मानवावर हल्ले होत असल्याने घराबाहेर पडावे की नाही, अशी परिस्थिती बिबट्याच्या निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता थेट कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

