प्रभागाचा लेखा जोखा - प्रभाग क्रमांक १३

प्रभागाचा लेखा जोखा - प्रभाग क्रमांक १३

Published on

प्रभागाचा लेखा जोखा

प्रभाग क्रमांक १३

पायाभूत सुविधांची ‘ऐशी-तैशी’;
रेडझोनची टांगती तलवार

पिंपरी, ता. १३ : रेडझोनमुळे रखडलेली विकासकामे, अनियमित पाणीपुरवठा, विजेचा लपंडाव, अस्वच्छता, अंतर्गत अरुंद रस्ते, झोपडपट्यांचे रखडलेले पुनर्वसन, मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी, अशी स्थिती प्रभाग क्रमांक १३ म्हणजेच निगडी गावठाण-यमुनानगर प्रभागाची आहे. या प्रभागाचा ४५ ते ५० टक्के भाग रेडझोनमध्ये येत असून, येथील रहिवाशांवरही रेडझोनची टांगती तलवार कायम आहे.
गावठाण, झोपडपट्टी तसेच बंगले व अपार्टमेन्ट असलेला भाग या प्रभागात मिश्र लोकवस्ती आहे. मुंबई-पुणे महामार्ग, स्पाईन रोड, निगडी-त्रिवेणीनगर रस्ता या प्रभागातून गेला असून, पीएमपीपीएलचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, भक्ती-शक्ती चौकही या प्रभागात आहे. सेक्टर क्रमांक २२ येथे काही वर्षांपूर्वी शहरातील विविध झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारती उभारल्या आहेत. समोरच पीसीएमसी कॉलनी आहे. निगडी गावठाणचाही भाग असून, येथे स्थानिकांची बैठी घरे तसेच बंगले आहेत. यमुनानगर, साईनाथनगर भागातही बंगले तसेच अपार्टमेंट आहेत.


चतुःसीमा
उत्तरेला - त्रिवेणीनगर
पूर्वेला - दुर्गानगर
पश्चिमेला - लष्कराची हद्द
दक्षिणेला - जुना मुंबई-पुणे महामार्ग
------------------------
समाविष्ट भाग
निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक २२, ओटास्कीम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्री कृष्ण मंदिर परिसर, साईनाथनगर आदी परिसर.
----------------
प्रमुख समस्या
- गल्लीबोळ, अरुंद रस्ते ः निगडी गावठाण भागात अक्षरशः गल्लीबोळ व अरुंद रस्ते आहेत. पायी चालणेही कठीण असताना एखाद्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील पोहोचणे तर दूरच.
- रेडझोन : या प्रभागाचा बहुतांश भाग रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. नागरिकांना अधिकृत बांधकामे करता येत नाही. सध्याच्या बांधकाम धारकांकडून महापालिका कर वसूल करीत आहे. मात्र, पुरेशा पायाभूत सुविधा पुरवीत नाही.
- अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा ः सेक्टर क्रमांक २२ यासह निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर आदी भागात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
- उघडे नाले, सांडपाणी व्यवस्था : अनेक ठिकाणी उघडे नाले असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणी सांडपाण्याची सुविधाही उपलब्ध नाही. नाले बंदिस्त करण्याची अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे.
- रस्त्यावरच भाजी विक्रीचे स्टॉल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात भाजी मंडईची व्यवस्था नसल्याने रस्यावरच भाजी विक्रीचे स्टॉल लागतात. यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते.
- झोपडपट्ट्यांचे रखडलेले पुनर्वसन : सेक्टर क्रमांक २२ येथील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे.
- अस्वच्छता : सेक्टर क्रमांक २२ तसेच अंकुश चौक परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येतात.

*कुठे? काय?
- निगडी गावठाण भागात स्थानिकांची घरे असून, यमुनानगर भागात बंगले आणि सोसायटी आहेत. तर सेक्टर क्रमांक येथेही मिश्र लोकवस्ती आहे. परिसरात मोठ्या शाळा आहेत.
- या प्रभागाचा बहुतांश भाग रेडझोनमध्ये येतो. अनेक विकासकामे रखडली आहेत.
- मेट्रोच्या कामामुळे लोकमान्य टिळक चौकात खोदाई केली असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

- नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यमुनानगर येथे पोलिस चौकी सुरू करण्यात आली. मात्र, ही चौकी अनेकदा बंद असते.
- सेक्टर क्रमांक २२ मधील अंतर्गत रस्ते व्यवस्थित नाहीत. येथील उद्यानाच्या कामालाही अनेक वर्षांपासून मुहूर्त लागलेला नाही.
- पीसीएमसी कॉलनीतील इमारतींची दुरवस्था झाली असून, पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
- सेक्टर क्रमांक बावीस मधील महापालिकेचे गाळे वापराविना पडून आहेत.
- निगडी गावठाणातील लक्ष्मीनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, साईनाथनगर ते निगडी गावठाण रस्त्याचे डांबरीकरण रखडले.

*असे आहेत मतदार
पुरुष : २५,२६०
स्त्री : २३,२६४
इतर : ०८
एकूण : ४८,५३२
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com