लग्नापूर्वी प्रत्येकाने आरोग्य कुंडली तपासावी

लग्नापूर्वी प्रत्येकाने आरोग्य कुंडली तपासावी

Published on

बारामती, ता. ३१ : लग्न जमविताना पत्रिका बघण्यापेक्षा जोडीदाराची आरोग्य कुंडली जमते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. दोघांच्याही काही तपासण्या केल्यास वैवाहिक आयुष्य अधिक सुखाचे ठरते, असा सल्ला डॉ. वर्षा सिधये यांनी दिला.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात लिनेस क्लब ऑफ बारामतीच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या वसतिगृह समितीच्या सदस्या संगीता वाघोलीकर, शुभांगी कोठारी, डॉ. अंजली व्होरा, लिनेसच्या अध्यक्षा उज्ज्वला शिंदे, मनीषा खेडेकर, सुवर्णा मोरे, विजया कदम, रिनल शहा, सीमा चव्हाण, अंजली संगई, अनुराधा गुजर, भैरवी गुजर, स्वाती ढवाण, संगीता भापकर, धनश्री गांधी, निधी मोता, मृदुल देशपांडे, वसतिगृह अधीक्षिका अनसूया काळे, मनीषा ढमाळ व रेश्मा शेख उपस्थित होते.
कर्करोगाविषयी माहिती देताना डॉ. सिधये म्हणाल्या, गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी ‘एचपीव्ही’ लसीचे तीन डोस घ्यायला हवेत. आनुवंशिकता, लठ्ठपणा, व्हायरल इन्फेक्शन यामुळे कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढते. प्रत्येक मुलीने नियमित तपासणी करत राहणे आवश्‍यक आहे. कर्करोगाचे निदान वेळेवर झाले तरच उपचार शक्य आहेत. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी यांनी ‘एचआयव्ही’, ‘ऑस्ट्रेलिया अँटीजेट’, हिपॅटायटीस बी’, ‘थॅलॅसिमिया मायनर’ या चार तपासण्या करून घेतल्यास पुढील जीवन सुखमय होते. दोघांचा रक्तगट एकच असलातरी अडचण येत नाही. त्यामुळे जोडीदाराला नाकारणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com