जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा

Published on

पुणे, ता. ६ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३) सर्व तालुक्यांमधील एकाच दिवशी ३० गावांना प्रत्यक्ष भेटी देत ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांचा सखोल आढावा घेतला. योजनांची अंमलबजावणी, कामांचा दर्जा आणि लोकसहभाग यांचा थेट आढावा घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
अभियानांतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी भोर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन ग्रामपंचायतींच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी, विस्तार अधिकारी व संबंधित यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, पाणीपुरवठा योजना, नळजोडणी प्रकल्प, वृक्षलागवड उपक्रम, क्यूआर कोडवर आधारित कचरा संकलन व्यवस्था, सॅनिटेशन व स्वच्छता मोहिमा, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, आरोग्य सुविधा, धार्मिक स्थळे, सीसीटीव्ही तसेच समाजमंदिराचे अभ्यासिकेत रूपांतर केलेल्या वाचनालयांची प्रत्यक्ष पाहणी केली.
भेटीदरम्यान ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून कामातील अडचणी, प्रलंबित प्रस्ताव आणि पुढील विकास नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांना तत्काळ सूचना देण्यात आल्या असून, आवश्यक ठिकाणी सुधारणा करण्याचे आणि कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायती अधिक सक्षम, स्वयंपूर्ण आणि पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू असून, अशा प्रत्यक्ष भेटीमुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कामांचा दर्जा आणि लोकसहभाग वाढण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com