युद्धाची धग जिल्ह्यातील बाजारात

युद्धाची धग जिल्ह्यातील बाजारात
Published on

पुणे, ता. ११ : हजारो मैल दूर अमेरिका, इराण आणि इस्राईलमध्ये पेटलेल्या युद्धाचा वणवा आता पुणे जिल्ह्याच्या बाजारपेठेपर्यंत धग पोहोचवू लागला आहे. या जागतिक संघर्षामुळे उद्‍भवलेल्या तीव्र गॅसटंचाईने जिल्ह्याची औद्योगिक आणि कृषी अर्थव्यवस्था संकटात सापडली असून, व्यावसायिक गॅसअभावी चाकण, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी पट्ट्यातील शेकडो हॉटेल, ढाबे व कंपनी कॅंटीन्स बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाजीपाल्याला हक्काची बाजारपेठ असलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याने मागणी कमालीची घटली आहे. परिणामी, शेतात राबणाऱ्या बळिराजाचा माल बाजार समित्यांमध्ये पडून राहण्याची भीती निर्माण झाली असून, व्यापारी आणि शेतकरीवर्गात चिंतेचे सावट आहे. युद्धाची आग सातासमुद्रापार लागली असली, तरी त्याचा थेट फटका मात्र पुणे जिल्ह्यातील कष्टकरी आणि उत्पादकवर्गाला सोसावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com