जिल्हा परिषद निवडणूक

जिल्हा परिषद निवडणूक

Published on

भिर्रर्र...
जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी स्वबळाची तयारी
पुणे, ता. १३ : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे नुकत्याच झालेल्या नगपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा दिसले. मात्र, भाजपकडून संघटन वाढवत जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित लढण्याच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकाधिक जागा लढविण्याची तयारी केली आहे.
महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता युती आणि आघाड्यांबाबत सर्वच पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली होती. तेव्हापासून जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत सुमारे पावणेचार वर्षे प्रशासक कालावधी होता. या कालावधीमध्ये राज्यासह जिल्ह्यातील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे विभाजन झाले आहे. राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून बांधणी सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेत नेहमी वर्चस्व राहिले आहे. भाजप मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध माजी आमदारांचे, जिल्हा परिषदेतील माजी पदाधिकाऱ्यांचे प्रवेश घडवून आणले. सन २०१७च्या तुलनेत भाजपची सध्या ताकद वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य विजयी होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. ‘भाजपशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही,’ असे पदाधिकारी खासगीत सांगतात. तर नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत निवडणूक लढवणार असल्याचे तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. आता प्रत्यक्षात या सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची तयारी केली आहे. तर भाजपसोबत शिवसेना युती करणार किंवा नाही याबाबत उघडपणे बोलणे टाळले जात आहे, कारण महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला आलेला अनुभवामुळे शिवसेनेकडून वरिष्ठांचा आदेशाचे पालन केले जाईल, असे सांगितले जात आहे.

दृष्टीक्षेपात घडामोडी
- नगरपरिषदेतील यशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उत्साह दुणावला
- आपल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही, यासाठी भाजपचे प्रयत्न
- पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता.
- महापालिकेतील अनुभवामुळे भाजपसोबत युतीबाबत शिवसेना (शिंदे) सावध
- महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वतंत्र लढण्याची तयारी
- दोनही शिवसेना काही ठिकाणी एकत्र येण्याची चिन्हे

दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र येण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. गट, गण स्तरावर आमच्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे आमच्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये बहुमत असेल.
- राजेंद्र कोरेकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

पक्षाकडून सर्व गट आणि गणामध्ये तयारी केली आहे. काही दिवसांनी पक्षामध्ये काही मोठे प्रवेशही होतील, त्यांचा पक्षवाढीसाठी फायदा होईल. युतीबाबत प्रदेश पातळीवर जो आदेश येईल, त्याची अंमलबजावणी होईल. गट, गणानुसार बैठका झाल्या आहेत.
- शेखर वढणे, जिल्हाध्यक्ष, भाजप

महापालिकांची निवडणूक बघता जिल्ह्यात युती होते किंवा नाही, याबाबत अनिश्चितता आहे. शिवसेने स्वतंत्र तयारी केली आहे, पण
महायुती झाले तर चांगलेच आहे. महापालिकेत झालेल्या गोष्टींमुळे आम्ही आता सावध झालो आहोत. स्थानिक पातळीवर खासदार, आमदार आणि जिल्हा परिषदेतील अनुभवी माजी पदाधिकारी आहेत. त्यामुळे निवडणुकीची तयारी करणे आम्हाला सोपे झाले. महायुती करण्यासाठी सन्मानपूर्वक तोडगा काढणे गरजेचे आहे.
- रमेश कोंडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. अजूनही काहीजण अर्ज करत आहेत. आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आघाडी नाही झाली तर इच्छुक उमेदवारांची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आहे.
- श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. आता अंतिम तिकीट वाटप करण्याचे काम बाकी आहे. निवडणुकीसाठी तयार केलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व अंमलबजावणी केली आहे. आघाडीबाबत वरिष्ठ निर्णय घेतलीच, पण स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
- प्रकाश भेगडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

पंचायत समितीनिहाय सभापतिपदाचे आरक्षण

१) राजगड....
२) मुळशी...
३) भोर....
४) पुरंदर...
५) आंबेगाव...
६) मावळ....
७) बारामती....
८) हवेली....
९) शिरूर...
१०) दौंड...
११) जुन्नर...
१२) खेड....
१३) इंदापूर....

तालुकानिहाय गट व गण संख्या
तालुका - गट संख्या- गण संख्या

१) राजगड....२....४
२) मुळशी...३.....६
३) भोर....४......८
४) पुरंदर...४......८
५) आंबेगाव...५...१०
६) मावळ....५...१०
७) बारामती....६....१२
८) हवेली....६....१२
९) शिरूर...७....१४
१०) दौंड...७....१४
११) जुन्नर...८...१६
१२) खेड....८....१६
१३) इंदापूर....८....१६

एकूण....७३....१४६

पंचायत समितीनिहाय बलाबल (२०१७)
१) राजगड....
२) मुळशी...
३) भोर....
४) पुरंदर...
५) आंबेगाव...
६) मावळ....
७) बारामती....
८) हवेली....
९) शिरूर...
१०) दौंड...
११) जुन्नर...
१२) खेड....
१३) इंदापूर....

जिल्हा परिषदेतील बलाबल (२०१७)
राष्ट्रवादी काँग्रेस- ४३
शिवसेना- १४
काँग्रेस- ७
भाजप - ७
लोकशाही क्रांती- १
रासप- १
अपक्ष- २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com