अर्ज केवळ ऑफलाइन स्वीकारणार

अर्ज केवळ ऑफलाइन स्वीकारणार

Published on

पुणे, ता. १४ ः जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शुक्रवारपासून (ता. १६) उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे. प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे तेरा ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, अर्जांची छाननीही त्याच ठिकाणी होणार आहे. नऊ वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नगरपरिषद, नगरपंचायतीप्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीचे बिगूल वाजल्यानंतर ग्रामीण भागात दिवसभर उमेदवारी अर्जाबाबत चर्चा सुरू आहे. अनेकांनी पक्षाकडून, तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. १६) ते बुधवारी (ता. २१) दुपारी तीनपर्यंत प्रशासन अर्ज घेणार आहे. यामध्ये रविवारी (ता. १८) नामनिर्देशन अर्ज दिलेही जाणार नाहीत आणि स्वीकारलेसुद्धा जाणार नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गुरुवारी (ता. २२) सकाळी अकरापासून नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी वैध ठरलेल्या नामनिर्देशन अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर शुक्रवार (ता. २३) ते मंगळवारपर्यंत (ता. २७) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मात्र, २५ व २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज मागे घेता येणार नाहीत. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज माघारीसाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मंगळवारीच (ता. २७) दुपारी साडेतीननंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


येथे नामनिर्देशन अर्ज मिळणार
नामनिर्देशन अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात उपलब्ध असलेला नामनिर्देशन अर्ज आणि शपथपत्रात संपूर्ण माहिती भरून तो त्याच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करता येणार आहे.


निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज देण्याची ठिकाणे
तालुका -- ठिकाण
जुन्नर -- पंचायत समिती कार्यालय
आंबेगाव -- तहसील कार्यालय
शिरूर -- नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
खेड -- उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाडारोड, राजगुरुनगर
मावळ -- तहसील कार्यालय, वडगाव मावळ
मुळशी -- तहसील कार्यालय, पौड
हवेली -- सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आंबेगाव बुद्रूक
दौंड -- नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
पुरंदर -- नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
वेल्हे -- तहसील कार्यालय
भोर -- तहसील कार्यालय, राजवाडा चौक
बारामती -- तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत
इंदापूर -- नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com