भाजप-राष्ट्रवादीमधील लढती लक्षवेधी

भाजप-राष्ट्रवादीमधील लढती लक्षवेधी

Published on

अमोल शित्रे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगत आहे. तर, काही माजी नगरसेवक विविध पक्षांतून, तर काही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपचे अनेक माजी; तर भाजपने तिकीट नाकारलेले काही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे काही लढती अधिकच चुरशीच्या होण्याची चर्चा आहे.
शहरातील १२८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे, आप, वंचित यांसह अन्य पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या काही माजी नगरसेवकांनी पुन्हा ताकद पणाला लावली आहे.

बदललेली समीकरणे
- प्रभाग दोन : भाजपचे वसंत बोराटे व अश्विनी जाधव आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात
- प्रभाग पाच : राष्ट्रवादीतून संधी न मिळाल्याने अनुराधा गोफणे व जालिंदर शिंदे आता भाजपचे उमेदवार तर भीमाबाई फुगे आणि प्रियांका बारसे
-प्रभाग आठ : भाजपच्या माजी नगरसेवक सीमा सावळे राष्ट्रवादीच्या उमेदवार
-प्रभाग ११ : भाजपमधून आलेल्या आश्विनी बोबडे यांचे पती भीमा बोबडे शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवार
-प्रभाग १२ : राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर भाजपकडून रणांगणात
-प्रभाग १४ : शिवसेनेतून आलेल्या मीनल यादव यांना भाजपकडून संधी
-प्रभाग १५ : शिवसेना सोडून आलेले अमित गावडे हे भाजपकडून मैदानात, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले राजू मिसाळ रिंगणात
-प्रभाग १८ : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या अपर्णा डोके यांना संधी, शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अश्विनी चिंचवडे राष्ट्रवादीच्या उमेदवार
-प्रभाग २१ : भाजपकडून इच्छुक असलेले संदीप वाघेरे हे आता राष्ट्रवादीकडून उमेदवार. राष्ट्रवादीत असलेल्या उषा वाघेरे या भाजपकडून मैदानात
-प्रभाग २२ : अपक्ष नीता पाडाळ आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनोद नढे हे भाजपकडून निवडणुकीत
-प्रभाग २४ : भाजपमधून आलेल्या माया बारणे या आता राष्ट्रवादीच्या उमेदवार
-प्रभाग २५ : शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेले राहुल कलाटे हे यावेळी भाजपकडून निवडणुकीत
-प्रभाग २६ : भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात
-प्रभाग ३१ : अपक्ष माजी नगरसेवक नवनाथ जगताप यावेळी भाजपकडून रिंगणात

- भाजपकडून लढत असलेले माजी नगरसेवक किंवा त्यांचे कुटुंबिय

उषा ढोरे, शकुंतला धराडे, नितीन काळजे, राहुल जाधव, नितीन लांडगे, विलास मडिगेरी, हिराबाई घुले, रवि लांडगे (बिनविरोध), संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे (बिनविरोध), तुषार हिंगे, कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, शांताराम भालेकर, विनोद नढे, उत्तम केंदळे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, संगीता भोंडवे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, मोरेश्वर शेंडगे, सुरेश भोईर, शीतल शिंदे, जयश्री गावडे, सुजाता पालांडे, मनीषा पवार, स्व. अर्चना बारणे पती तानाजी बारणे, अभिषेक बारणे, ममता गायकवाड यांचे पती विनय गायकवाड, राहुल कलाटे, आरती चोंधे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, सारिका बोऱ्हाडे, सागर आंघोळकर यांच्या पत्नी रविना, शशिकांत कदम, प्रशांत शितोळे, हर्षल ढोरे, राजू मिसाळ, झामाबाई बारणे यांचे पुत्र सिद्धेश्वर बारणे, अपर्णा डोके, प्रकाश बाबर यांची सून ऐश्‍वर्या बाबर, नीता पाडाळे, नवनाथ जगताप, कैलास बारणे बंधू प्रवीण बारणे, शांताराम भालेकर, संजय उर्फ नाना काटे, चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंडे, शोभा आदियाल यांची सून दुर्गाकौर आदियाल, सुरेश नढे यांचे चिरंजीव हर्षद नढे, सद्गुरू कदम, मंगला कदम यांचे चिरंजीव कुशाग्र कदम, समीर मासुळकर यांच्या पत्नी शीतल मासुळकर

राष्ट्रवादीकडून लढणारे माजी नगरसेवक किंवा त्यांचे कुटुंबिय

योगेश बहल, श्याम लांडे यांच्या पत्नी मनीषा लांडे, जितेंद्र ननावरे, वैशाली घोडेकर, राहुल भोसले, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शीतल काटे, राजेंद्र जगताप, पंकज भालेकर, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, नारायण बहिरवाडे, निकिता कदम, हिरानंद आसवानी, संदीप वाघेरे, मच्छिंद्र तापकीर, संतोष कोकणे, माया बारणे, मयुर कलाटे, रेखा दर्शिले, रोहित काटे, स्वाती काटे, राजू बनसोडे, अतुल शितोळे, वसंत बोराटे, अश्‍विनी जाधव, प्रमोद कुटे, करुणा चिंचवडे यांचे पती शेखर चिंचवडे, काळुराम पवार, कोमल मेवानी पती दीपक मेवानी, सविता आसवानी, राजू लोखंडे, ॲड. सचिन भोसले यांच्या पत्नी ॲड. वर्षा भोसले, अश्‍विनी वाघमारे यांचे पती विक्रम वाघमारे, कैलास थोपटे यांच्या पत्नी अनिता थापटे, नागेश आगज्ञान यांची सून पूजा आगज्ञान, अनंत कोऱ्हाळे, अश्‍विनी चिंचवडे, तानाजी वाल्हेकर यांच्या पत्नी शोभा वाल्हेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक विश्वानाथ लांडे यांचे चिरंजीव विराज लांडे.

- शिवसेनेकडून लढणारे माजी नगरसेवक किंवा त्यांचे कुटुंबिय
नीलेश बारणे, सुलभा उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, अश्विनी बोबडे यांचे पती भीमा बोबडे, संध्या गायकवाड, किरण मोटे, मारुती भापकर, बाळासाहेब ओव्हाळ, वैशाली जवळकर, संध्या गायकवाड.

- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत असलेले माजी नगरसेवक
तुषार कामठे, सुलक्षणा शीलवंत.

मनसेकडून लढत असलेले माजी नगरसेवक
सचिन चिखले, अश्‍विनी चिखले

अपक्ष लढत असलेले माजी नगरसेवक किंवा त्यांचे कुटुंबिय
ॲड. सचिन भोसले, शारदा सोनवणे, राजेंद्र गावडे, प्रमोद ताम्हणकर, विलास नांदगुडे यांचे पुत्र शंतनू नांदगुडे, शैलेंद्र मोरे यांच्या पत्नी कविता मोरे

शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून लढत असलेले माजी नगरसेवक
- विश्वास गजरमल

निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक
भाजप - ६१
राष्ट्रवादी - ४३
शिवसेना - १०
अपक्ष - ६
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) २
मनसे- २
शिवसेना (ठाकरे) - १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com