दिव्यांगासाठी शिक्षण संकुल उभारण्याचा मानस : चांदेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगासाठी शिक्षण संकुल उभारण्याचा मानस : चांदेरे
दिव्यांगासाठी शिक्षण संकुल उभारण्याचा मानस : चांदेरे

दिव्यांगासाठी शिक्षण संकुल उभारण्याचा मानस : चांदेरे

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १९ : "सक्षम संस्थेने दिव्यांगाचा क्षमता विकास करून आदर्श निर्माण केला. क्षमताविकास डोळ्यासमोर ठेऊन सक्षम संस्थेने दिव्यांगाना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पवित्र काम केले आहे. दिव्यांग संस्थेच्यावतीने दिव्यांगासाठी कायमस्वरूपी राहण्यासाठी व शिक्षणासाठी संकुल उभे करण्याचा मानस असून तो लवकरच पूर्ण होईल. दिव्यांगांसाठी प्रतिमहिना स्वखर्चाने मदत केली जाईल," असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख व मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी केले.
उरवडे (ता.मुळशी) येथील पुणे जिल्हा सक्षम संस्थेच्या वार्षिक अधिवेशनात चांदेरे बोलत होते. यावेळी मुळशी तालुका दिव्यांग संस्था, जागृती दिव्यांग संस्था, साधना व्हिलेज, मुळशी मतिमंद संस्कृती प्रतिष्ठान आदी संस्थानी अधिवेशनात सहभाग घेतला. यावेळी दिव्यांगाना चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संदीप जठार, विनायक देवकर, राहुल वाचासुंदर,प्रांत अध्यक्ष मुरलीधर कचरे, सक्षमचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भेगडे, सचिव महेश टाकसाळे, सहसचिव गहिनीनाथ नलावडे, रामभाऊ गायकवाड, कैलास मारणे, कविता मोरे, रोहिणी आठवले, हेमंत साठे आदी उपस्थित होते.
यावेळी बाजीराव पारगे, नीलेश जागडे, ऋषिकेश इंदलकर, कुणाल मिठारे, शिवशंकर मुंडे, कुणाल पाटील, नंदू दगडे, महादेव पारखी, प्रवीण भरम, रवींद्र काळे, शिवाजी बिराजदार, प्रशांत काकडे, संभाजी साखरे यांनी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सक्षमचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी प्रास्ताविक तर सचिव विजय पगडे यांनी आभार मानले.

01691