
ठिबक सिंचनाच्या महत्त्वावर खारावडेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पिरंगुट, ता. ३० : खारावडे (ता.मुळशी) येथे मुठा खोऱ्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे शेतीतील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. येथे हेरिटेजवाडीत आयोजित केलेल्या शिबिरात शेतीमध्ये ठिबक सिंचनाचे महत्त्व, शासकीय योजना, अनुदानाच्या योजना , ठिबक सिंचनाची देखभाल आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. फिनोलेक्स प्लासोन कंपनीचे प्रतिनिधी राहुल चव्हाण व धनराज यूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ऊस पीक , भाजीपाला , फळझाडे आदी पिकांना ठिबक सिंचनाने पाणी पुरवठा केल्यास पाण्याची पन्नास टक्के बचत तर होतेच शिवाय पंचवीस ते तीस टक्के उत्पादन वाढीस मदत होते याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली. पर्यावरण मित्र रमेश मोगल यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शिबिरास कोळावड्याचे माजी सरपंच व आंबा उत्पादक शेतकरी सयाजी आढाव , प्रयोगशील शेतकरी तुकाराम मरे , दगडू मारणे ,रायबा उभे, सिधू अण्णा शिंदे, शिवाजी मारणे, अंकुश मारणे, उमेश उभे, शंकर येनपुरे,किसन उभे, अप्पा मारणे ,खंडू उभे, सागर येनपुरे, सुनील बावधने,तानाजी मारणे आदी शेतकरी उपस्थित होते.
01716