Fri, March 31, 2023

उरवडे तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी अर्जुन तांगडे
उरवडे तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी अर्जुन तांगडे
Published on : 28 January 2023, 1:02 am
पिरंगुट, ता. २८ : उरवडे (ता. मुळशी) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन दत्तोबा तांगडे, तर उपाध्यक्षपदी संतोषी संतोष मारणे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच तुषार खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मिलिंद काळे, उपसरपंच कालिदास भंडलकर, ग्रामपंचायत सदस्य अलका मारणे, माजी सरपंच शांताराम साळुंके, माजी उपसरपंच व कुस्ती संघाचे जिल्हा सदस्य नरेंद्र मारणे, पोलिस अंमलदार सादिक इनामदार, पोलिस पाटील निशिगंधा गुरव, सुमन मुरकुटे, मोहन मारणे, श्रीहरी मारणे, गणेश लोहार, नारायण मारणे, सुशांत मारणे, अमोल मारणे, दीपक मारणे, सोमनाथ मारणे आदी उपस्थित होते.