खारावडे येथे ७ मे रोजी मोफत सामूदायिक विवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारावडे येथे ७ मे रोजी
मोफत सामूदायिक विवाह
खारावडे येथे ७ मे रोजी मोफत सामूदायिक विवाह

खारावडे येथे ७ मे रोजी मोफत सामूदायिक विवाह

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ८ : खारावडे (ता. मुळशी) येथे येत्या ७ मे रोजी बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. चंद्रकांत अण्णा भरेकर व श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट खारावडे यांच्या सौजन्याने हा विवाह सोहळा होणार आहे.
खारावडे येथे सन २००३पासून या सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरवात केली. या सोहळ्यात नववधूस दोन साड्या, परकर, ओढणी; तसेच नववरास सफारीचे कापड देण्यात येते. तसेच, नवदांपत्यासह संसारोपयोगी २१ भांड्याचा संच देण्यात येतो. विवाह सोळ्यास येणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळीची भोजनाची सोय केलेली आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू-वरांस नाव नोंदणी करावी लागते. नाव नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आतापर्यंत या सोहळ्यात पाचशेपेक्षा जास्त जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
गेली तीन वर्षे कोरोनामुळे हा उपक्रम होऊ शकलेला नाही. यावर्षी येत्या ७ मे रोजी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यास नव वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र नारायणपूरचे सद्‍गुरु नारायण महाराज उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक गणेश भरेकर यांनी दिले.
सहभागासाठीच्या नाव नोंदणीसाठी सुभाष रोकडे (९८२२७ ४३९१०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.