पराभवाच्या मानसिकतेतून 
बाहेर पडून कामाला लागा

पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडून कामाला लागा

पिरंगुट, ता. ६ : ‘‘लोकसभेच्या निवडणुकीतील भावनिक लाट आणि उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने मतदारांपर्यंत आपण पोचू शकलो नाही. त्यामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे. मात्र, या पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडून सर्वांनी नव्या जोमाने आणि उमेदीने कामाला लागा. बुथ पातळीपासून संघटनेची नव्याने उभारणी करा. ‘लाडकी बहीण’, तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोचवा. विधानसभेला आपल्याला नक्कीच भरघोस यश मिळेल,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मुळशीतील पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कासार आंबोली (ता. मळशी) येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गारटकर बोलत होते. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे यांनी प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याचा ठराव मांडला. यावेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, कालिदास गोपालघरे, चंद्रकांत भिंगारे, अमित कंधारे, विनोद कंधारे, सुनील वाडकर, बाळासाहेब सणस, सुरेश हुलावळे, चंदा केदारी, सचिन आमराळे, संजय उभे, प्रशांत रानवडे, संजय सातव, तात्या देवकर आदी उपस्थित होते. माउली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कार्याध्यक्ष आनंद घोगरे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com