पुणे
भुकूमला संत गणोरेबाबांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम
पिरंगुट, ता. २९ : भुकूम (ता. मुळशी) येथील हरिराम आश्रय मठात प्रेमनिधी संत गणोरेबाबांची ४७ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. काकड आरती नंतर बाबांच्या समाधीला रुद्राभिषेक करण्यात आला. गणोरेबाबा आणि सीतामाई यांच्या समाधी पूजनानंतर हरिराम आश्रय मठाचे विश्वस्त एकनाथ हगवणे यांचे प्रवचन झाले. यावेळी भजन, नामजप घेण्यात आला. आरतीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी मठाचे विश्वस्त निनाद मुळे, सुभाष तापडिया, नामदेव माझिरे, दशरथ वहाळे, शिवाजी हगवणे, पोपट आंग्रे, नाना शिंदे, अशोक माझिरे, हरिभाऊ हगवणे, संतोष माझिरे उपस्थित होते.

