भूगावमधील दवाखान्याची इमारत मोजतिये अखेरची घटका
पिरंगुट, ता. २० : भूगाव (ता.मुळशी) येथील पशुवैद्यकीय दवाखाना व्हेंटिलेटरवर आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण झाली असून मोडकळीस आलेली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अखेरची घटका मोजत आहे. इमारतीभोवती घाणीचे आगार तयार झाल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. इमारत आणि डॅाक्टरांच्या अभावी येथील दवाखाना असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे.
या दवाखान्यासाठी सध्या मुख्य डॉक्टरांची स्थायी स्वरूपात नियुक्ती नाही. अतिरिक्त कार्यभार डॉक्टर भूमिका रणवीरकर यांच्याकडे आहे. पशुपालकांना जनावरांच्या उपचाराची गरज भासल्यास तात्पुरता कार्यभार असलेल्या रणनवीर यांच्याशी संपर्क साधला जातो. त्यानंतर त्या पशुधनांना उपचाराची सेवा पुरवितात. येथील दवाखान्याची इमारत तातडीने दुरुस्त करावी, कायमस्वरूपी डॅाक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची स्थायी स्वरूपात नियुक्ती करावी, अशी मागणी येथील पशुपालक, गाडा मालक, पाळीव प्राणी मालक आणि अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
पशुपालकांची अपेक्षा
- सुसज्ज इमारत आणि परिसर स्वच्छ असावी
- डॉक्टरांना बसण्यासाठी नियमित जागा असावी
- सरकारी नाममात्र दरात पशुपालक तसेच पाळीव प्राणी उपचार मिळावेत.
- सर्व प्रकारचे आवश्यक आलेले लसीकरण वेळेत व मोफत मिळावेत.
- कृत्रिम रेतन तसेच वंध्यत्व निवारण उपचार उपलब्ध व्हावे.
- पशुपालकांना चारा पिके उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करून योजना राबवण्यात.
परिसरातील पशुधन
पोल्ट्रीमधील पक्षी.........१०५६
म्हशी.........१२३२
गाई.........१०२८
बैल .........७०
लसीकरण
लाळ्या खुरकूत.......२०५५
पशुवैद्यकीय डॉक्टरांची नेमणूक स्थायी स्वरूपात नसल्याने खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. त्यांना अधिकचे०पैसे मोजावे लागतात. भूगावमध्ये गाई, म्हशी तसेच अन्य पाळीव प्राण्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे येथील दवाखान्याची इमारत तातडीने दुरुस्त करावी व कायमस्वरूपी डॅाक्टरांची नेमणूक करावी.
- हनुमंत चोंधे, पशुपालक
04937
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

