करिअर कॉन्क्लेव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिरंगुट, ता. १७ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील पीआयबीएममध्ये गुरुवारी (ता. १५) व शुक्रवारी (ता. १२) करिअर कॉन्क्लेव्ह झाला. यामध्ये अभियांत्रिकी, वाणिज्य, विज्ञान, कला व व्यवस्थापन आदी शाखांतील अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठी व्यासपीठ असलेल्या उद्दीपनच्या वतीने तसेच रमणबाईट प्रा. लि. आणि एआयसीटीईच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. यात बँकिंग व वित्तीय सेवा, फिनटेक, आयटी व आयटीईएस, रिअल इस्टेट, एडटेक, कन्सल्टिंग, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोटिव्ह, रिटेल, ई-कॉमर्स, हॉस्पिटॅलिटी व प्रोफेशनल सर्व्हिसेस आदी उद्योगांचा समावेश होता. या मेगा जॉब फेअरमध्ये बजाज हाउसिंग फायनान्स, फ्लिपकार्ट, डब्ल्यूएनएस, पेटीएम,ॲक्सिस बँक, डी-मार्ट, सूझलॉन, टेलिपरफॉर्मन्स, एकलेर्क्स, बीव्हीजी इंडिया आदी कंपन्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुलाखती घेतल्या. यातून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सेल्स ॲण्ड मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, कस्टमर सपोर्ट, ऑपरेशन्स, ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी, डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी, डिझाईन इंजिनिअर्स, साइट इंजिनिअर्स, प्रॉडक्शन इंजिनिअर्स, क्वालिटी इंजिनिअर्स, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, फायनान्स असोसिएटस आदी नोकरीसाठी संधी मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

