पुरंदरच्या दुर्गम भागात जल्लोषात स्वागत
परिंचे , ता. २२ : ‘बजाज पुणे ग्रॅंड टूर -२०२६’ स्पर्धेचा तिसरा टप्पा गुरुवारी (ता. २२ ) पार पडला. पुरंदर तालुक्यातील दऱ्या खोऱ्यातून बारामतीकडे सायकलपटू वेगात रवाना झाला. तालुक्यातील दुर्गम भागात परदेशी पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सासवड येथून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सुपा मार्गे पानवडी घाटातील तीव्र उतार वेडीवाकडी वळणे अवघड चढ माथा पार करत पुरंदर किल्ल्यास वळसा घालून काळदरी, धनकवडी, मांढर, माहूर, परिंचे, वाल्हे मार्गे दुपारी दोन वाजता बारामतीकडे मार्गस्थ झाला.
स्वागत कमानी, ढोल ताशा, रांगोळी काढून प्रत्येक गावात सायकलपटूंचे जोरदार स्वागत केले. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करून परदेशी पाहुण्यांचे स्वागत करून टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन होत होते.
दरम्यान, सायकलींचा वेग एवढा होता की क्षणार्थात स्पर्धक दिसेनासे होत होते, अशी माहिती परिंचे येथील शेतकरी संजय जाधव यांनी दिली.
स्पर्धेसाठी नव्याने रस्ते तयार करण्यात आले आहेत. स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या होत्या. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, धोका दर्शक व पांढऱ्या रंगाचे पट्टे काढण्यात आले असल्याचे बांधकाम विभागाच्या उपअभियंता स्वाती दहिवाल यांनी सांगितले. स्पर्धेप्रसंगी शाखा अभियंता सुमेर नवले, ओंकार रेळेकर, वीरकुमार शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
‘बजाज पुणे ग्रॅंड टूर -२०२६’निमित्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पहिल्यांदाच पाहण्याची संधी मिळाली. अनेक विद्यार्थी या स्पर्धेतून प्रेरणा मिळणार आहे. भविष्यात आम्ही अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू.
- जान्हवी शिवरकर, विद्यार्थिनी
पोलिस बांधवांसाठी अल्पोपाहार
सायकल स्पर्धेसाठी गावोगावी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अनेक गावांतील तरुण मंडळींनी सकाळपासून बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिस बांधवांना पिण्याचे पाणी तसेच अल्पोपाहार उपलब्ध करून दिल्याचे सुजित जाधव, अविनाश कदम यांनी सांगितले.
02924
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

