दारवली येथील महिला मुलीसह बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारवली येथील महिला मुलीसह बेपत्ता
दारवली येथील महिला मुलीसह बेपत्ता

दारवली येथील महिला मुलीसह बेपत्ता

sakal_logo
By

पौड, ता. १३ : दारवली (ता. मुळशी) येथील महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे. मोहिनी सुरेश बलकवडे (वय. ३५, रा. दारवली, ता. मुळशी) आणि लीना सुरेश बलकवडे (वय ३) असे आई व मुलीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती सुरेश तबाजी बलकवडे यांनी पौड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सुरेश बलकवडे हे नेहमीप्रमाणे कामावर गेले असता त्यांची पत्नी मोहिनी मुलगी लीना ला घेऊन कुणाला काहीही न सांगता घरातून गेली आहे. नातेवाइकांनी अनेक ठिकाणी या दोघींचाही शोध घेतला असता त्या मिळून आलेल्या नाही.
मोहिनी यांची उंची ५ फूट, रंग गोरा, केस लांब काळे, चेहरा गोल, नेसणीस लाल रंगाची साडी, हिरवे रंगाचा ब्लाऊज, पायात निळे रंगाची चप्पल, हातात हिरव्या रंगाच्या बांगडया, गळ्यात मंगळसूत्र असा वेष परिधान केला असून त्यांना मराठी, हिंदी भाषा बोलता येते. तर लिनाचा रंग गोरा, डोळे काळे, गळ्यात काळ्या रंगाचा दोरा, कानात साधे रिंग असून अंगात लाल रंगाचा फ्रॉक घातलेला आहे. याबाबत माहिती मिळाल्यास पौड पोलिस ठाण्यात (०२०२२९४३१३३) संपर्क साधावा असे आवाहन केले.