भालगुडीत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भालगुडीत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची शपथ
भालगुडीत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची शपथ

भालगुडीत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची शपथ

sakal_logo
By

पौड, ता. २० : मुळशी तालुक्यातील कार्यकर्ते ठाकरे गटाचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला. भालगुडी येथील श्री क्षेत्र स्वयंभू नारायणदेव मंदिरात महादेवाच्या पिंडीवर बेलपत्राचा अभिषेक घातला व उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.
महाशिवरात्रीनिमित्त कार्यकर्त्यांनी भालगुडीच्या जागृत देवस्थानात एकत्र आली होती. यावेळी वज्रमूठ उभी करून (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प केला. यावेळी सचिन खैरे म्हणाले की, शिवसेनेला ५६ वर्ष झाली. शिवसेना आणि ठाकरे या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, शिवसेना ठाकरे कुटुंबापासून वेगळी होऊच शिकत नाही.

यावेळी तालुका प्रमुख सचिन खैरे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ‌, ज्येष्ठ नेते नामदेव टेमघरे, भालगुडीचे सरपंच रामदास साठे, संतोष साठे, संजय महाराज भरम, ज्ञानेश्वर सावंत, मारुती फाले, रूपेश जाधव, संतोष लोयरे, संजय साठे, सचिन सावंत, नितीन लोयरे, शांताराम साठे, नितीन साठे, पांडुरंग सावंत, सुनील मोडक आणि शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

02086