शिक्षण संस्कारातून देशाची भावी पिढी घडते ः कडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण संस्कारातून देशाची भावी पिढी घडते ः कडू
शिक्षण संस्कारातून देशाची भावी पिढी घडते ः कडू

शिक्षण संस्कारातून देशाची भावी पिढी घडते ः कडू

sakal_logo
By

पौड, ता. १८ : ‘शाळेत मिळणाऱ्या शिक्षण आणि संस्कारातूनच देशाची भावी पिढी घडत असते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आणि परिवाराच्या उज्वल भवितव्यासाठी सातत्याने शालेय वयातच अभ्यास तसेच चांगल्या सवयी लावून घ्याव्यात,’ असे आवाहन पौड (ता. मुळशी) ग्रामपंचायतीचे सरपंच अजय कडू यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाला पौड ग्रामपंचायतीच्यावतीने संगणक संच आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले. त्याच्या वितरणप्रसंगी कडू बोलत होते.

माजी सरपंच जगदीश लांडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य शाम नवले, प्रशांत वाल्हेकर, किरण अग्नेन, तंटामुक्ती अध्यक्ष रितेश ढोरे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाव्हळ, असदे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश शिंदे, पौड विद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही. भोकरे आदी उपस्थित होते.

कडू म्हणाले की, पौड ग्रामपंचायत विद्यालयास भौतिक सुविधा पुरविण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहील. दानशूर मंडळींनीही शाळेच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे.
भोकरे यांनी यावेळी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि संगणक संचाचे हस्तांतरण करण्यात आले.
प्रास्ताविक एस. एस. गोवंडे यांनी केले. सूत्रसंचालन बंडू दातीर यांनी, तर आभार अनिल काळभोर यांनी मानले.
------------------