मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा 
मुळशी तालुक्यात जल्लोष

मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा मुळशी तालुक्यात जल्लोष

पौड, ता. ९ : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे मुळशीकरांनी जल्लोष केला.
मुळशीतील मुठा गावी जन्मलेल्या मुरलीधर मोहोळ यांचे दुसरीपर्यंतचे शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले. त्यांचे वडील उपजीविकेसाठी कुटुंबासह पुण्यात आले. अशोक मोहोळ यांच्यानंतर मोहोळ घराण्याला आणि मुळशी तालुक्याला दुसरा खासदार मिळाला. पहिल्याच टर्ममध्ये त्यांची केंद्रीय मंत्रिपदीही वर्णी लागली. त्यामुळे मंत्रिपदाच्या रूपाने मुळशी तालुक्याचा झेंडा दिल्ली दरबारी प्रथमच फडकला. त्यांच्या या निवडीचे तालुक्यात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लाडू, पेढे वाटप करून आनंद साजरा केला. जन्मगाव असलेल्या मुठा, सासुरवाडी असलेल्या भूगावमध्येही जल्लोष करण्यात आला.

माझे नातजावई पुण्याचे खासदार झाले. केंद्रात मंत्रिपदाचीही त्यांना संधी मिळाली. याचा आम्हा इंगवले परिवाराला, तसेच मुळशीकरांना सार्थ अभिमान आहे. नातजावई माझा भला आहे. त्यांच्या हातून देशाची चांगल्याप्रकारे सेवा घडो, मुळशी तालुक्याचे नाव दिल्ली दरबारी गाजो, हीच त्यांना शुभेच्छा.
- रामचंद्र नामदेव इंगवले, मुरलीधर मोहोळ यांचे आजेसासरे

मुरलीच्या रूपाने मुळशी तालुक्याला एक मंत्री मिळाला. मोहोळ घराण्याला याचा अभिमान वाटतो. मामासाहेबांनी तालुक्यात प्रथम राजकारणातून समाजकारणाला सुरूवात केली. कुस्तीला राजाश्रय देवून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोचविले. त्यांच्यानंतर मुळशीकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ खासदार झाला. मंत्रिपदही मिळाले. त्यामुळे पूर्वजांचे पुण्य कामी आले.
- अशोक मोहोळ, माजी खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com