पुणे
पौडला रक्तदान शिबिर
पौड, ता. ५ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६३व्या वर्धापनदिनानिमित्त पौड (ता. मुळशी) येथील पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, पीडीसीसी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, अंकुश मोरे, सचिन खैरे, नीता नागरे, राम गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे मान्यवर, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिबिराचे नियोजन रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्थेचे प्रमुख चंद्रशेखर शिंदे, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष संदीप दुर्गे, सरचिटणीस कुंडलिक कांबळे, कार्याध्यक्ष किशोर बेलदार, महिला आघाडीच्या जिल्ह्याध्यक्षा प्रियतमा दसगुडे, सदानंद चौधरी, कविता कांबळे, वंदना कोल्हे, परमेश्वर शिंदे, मारुती शेडगे, सुहास होमकर, विनोद भरणे, सुनीता कांबळे यांनी केले.