पुणे
अंबडवेटमधील कंपनीला आग; तिघेजण जखमी
पौड, ता. २८ : अंबडवेट (ता. मुळशी) येथील कंपनीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या आगीत कंपनीतील मशिनरी आणि मालाचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (ता. २८) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरे फाटा ते दारवली रस्त्याच्या दरम्यान अंबडवेट गावच्या हद्दीत स्वराज एंटरप्राइजेस कंपनीत सोडियम क्लोराइडचे पॅकेजिंग होत होते. दुपारच्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्यासह पोलिस घटनास्थळी हजर झाले. मारुंजीच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत संदीप लक्ष्मण शेंडकर (वय ४९), मोहित राज सुखन चौधरी (वय ४९) आणि रेणुका धनराज गायकवाड (वय ४०) हे जखमी झाले आहेत.
04369