मुळशीची जीवनवाहिनी अडचणीत
पौड, ता. ११ : मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील २१ गावे आणि वाड्यावस्त्यांची जीवनवाहिनी असलेल्या मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पावणेतीन कोटी रुपये पाणीपट्टी थकली आहे. वीजबिल थकल्याने महावितरणने विद्यूत पुरवठा बंद करण्याची नोटीस जिल्हा परिषदेला पाठविल्याने कोणत्याही क्षणी ही योजना बंद होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ग्रामस्थांनी पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे जमा करावी. ही योजना चालविण्यासाठी दर महिना सरासरी १४ लाख रुपयांची आवश्यकता असते. तथापि ग्रामस्थ वेळेत पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे जमा करीत नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत केवळ दोन कोटी रुपयांची वसुली झाली. परंतु, सप्टेंबर अखेरीस दोन कोटी ३७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्याचप्रमाणे वीजबिल थकबाकी ४६.४० लाख, अनामत रक्कम १९.९० लाख त्याचप्रमाणे देखभाल दुरुस्तीसाठी १५ लाख अशी एकूण ८१.३० लाख रुपयांची सध्या गरज आहे. त्यामुळे ही योजना चालू ठेवण्यासाठी शंभर टक्के वसुली होणे आवश्यक आहे. निधी नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. वीजबिल थकल्याने महावितरणनेही विद्यूत पुरवठा बंद करण्याची नोटीस पाठविली आहे.
सप्टेंबरअखेरपर्यंत या योजनेची तीन कोटी ५२ लाख ९९ हजार ८७८ रुपये पाणीपट्टी थकलेली होती. त्यापैकी २०२५- २६ च्या मुद्रांकमधून ७७ लाख ९३ हजार ५२२ रुपये वसूल करण्यात आले. तरीदेखील दोन कोटी ७५ लाख सहा हजार ३५६ रुपये अद्यापही थकबाकी आहे.
विविध गावांतील थकबाकीची रक्कम -
माले (१०३०६०), संभवे (२०८०८४), जामगाव दिसली (२०७५१९), अकोले (२२६७१३), कोंढावळे कळमशेत (९७५९९८), पौड विठ्ठलवाडी (४७४५६११), भादस शिळेश्वर (१५००४६१), असदे (१६२१६२), खुबवली (६५७६९१), रावडे हुलावळेवाडी (१४४६४०), दखणे (६४५००) चाले सावरगाव करमोळी (१२१५१३), दारवली (१९६८४६१), मुगावडे (१३३३२३), अंबडवेट (७२४०४५), भरे (१९६७८५), पिरंगुट (९१५२५९३), शेरे (१११५६०), कासार आंबोली (११५३९०९), घोटावडे (३८२३९४०), मुलखेड (११४६३३).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

