आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पौड, ता.२३ : बावधनचे माजी सरपंच राहुल दुधाळे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भुसारी कॉलनी प्रभाग क्रमांक १० येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहीर, जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, सुरेश भोर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, युवासेनचे अविनाश बलकवडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका स्वाती ढमाले, बावधनचे माजी सरपंच राहुल दुधाळे, बबनराव दगडे, सुदाम भुंडे, राजेंद्र भुंडे, बापुसाहेब पाडाळे, प्रदीप वाघमारे, अशोक भुंडे, तानाजी दगडे, भाऊसाहेब दगडे, प्रदीप दगडे, नितीन दगडे, दत्तात्रेय दगडे, हरिश्चंद्र दुधाळे, प्रदीप बडे, अशोक मोकाशी, किरण कुडापणे, काशिनाथ दगडे, तुकाराम दगडे, महेश दगडे, अनिल दगडे, चंद्रकांत दगडे, दिलीप दगडे आदी उपस्थित होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील उद्योजक रमेश म्हेत्रे यांनी ठाकरे यांच्या हस्ते ‘शिवबंधन’ बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
04520

