पीडीसीसी बॅंक मुळशी विभागाकडून श्रद्धांजली
पौड, ता. ५ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुळशी विभागाच्यावतीने पौड (ता. मुळशी) येथे झालेल्या शोकसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
या शोकसभेला पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, जिल्हा दूध संघांचे संचालक चंद्रकांत भिंगारे, माऊली कांबळे, चंदाताई केदारी, मधुरा भेलके, सुरेखा चौधरी, राजेंद्र मारणे, विभागीय अधिकारी सुरेश नागरे, वसुली अधिकारी अमोल मारणे, विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह इतरांना अश्रू अनावर झाले. चांदेरे यांनी अजितदादांच्या स्वभावाचे पैलू सांगितले. राजेंद्र ओव्हाळ म्हणाले, ‘‘माझावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल केले होते. पण परिस्थिती चिंताजनक असल्याकारणाने मला कमला नेहरू रुग्णालयात हलविले. तिथेही डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मी सुनील चांदेरेना फोन केला. त्यांनी ही बाब दादांच्या कानावर घातली. दादांनी लगेच रुग्णालय प्रशासनास फोन करून तत्काळ यंत्रणा कामाला लावली आणि मला तत्काळ उपचार मिळाला. त्यामुळे माझा जीव वाचला.’’
खारावडे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके म्हणाल्या, ‘‘खारावडे येथे पाण्याचा टाकीचे उद्घाटन करण्यासाठी मी दादांकडे गेले. दादा म्हणाले सरपंच कुठे आहे. आमचे सरपंच धनगरवस्तीवर होते. त्यांच्याशी संपर्क साधून दादांना फोन दिला. दादा म्हणाले, सरपंच टाकीचे उद्घाटन करायचे आहे, मी आले तर चालेल ना? अशाप्रकारे गावात अंतर्गत वाद आहे की नाही याची दादांनी शहानिशा केली. असे दादांचे परखड काम होते.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

