भूगावातील दोघे जण करणार प्रतिनिधित्व

भूगावातील दोघे जण करणार प्रतिनिधित्व

Published on

पौड, ता. ११ : भूगाव (ता. मुळशी)मधील शांताराम इंगवले हे नऊ वर्षांच्या फरकानंतर दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत जात असून दगडूकाका करंजावणे प्रथमच पंचायत समितीत प्रतिनिधित्व करणार आहेत. एकाच गावातील दोघेजण तालुक्याचे लोकप्रतिनिधी होणे ही मुळशीतील पहिलीच घटना आहे.
भूगाव हे तालुक्याचे प्रवेशद्वार असलेले गाव आहे. या गावातून जिल्हा परिषदेसाठी शांताराम इंगवले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तर दगडूकाका करंजावणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भूगाव पंचायत समिती गणाची उमेदवारी मिळाली होती. याच गणातून भूगावमधीलच अनिल पवार हे शिवसेना ठाकरे पक्षाची मशाल घेऊन करंजावणे यांच्या विरोधात उभे होते.
या निवडणुकीत भूगावकरांनी करंजावणे आणि इंगवले या दोघांनाही गावातून आघाडी दिली. इंगवले हे गटातून विजयी झाले. तर करंजावणे गणातून विजयी झाले. इंगवले आणि करंजावणे यांच्या विजयामुळे एकाच गावातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सदस्य होणे ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे. इंगवले यापूर्वी 2012 ते 2017 या कार्यकाळात याच गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते. यापूर्वी भूगाव ग्रामपंचायतीत इंगवले सरपंच असताना करंजावणे उपसरपंच म्हणूनही बरोबरीने काम करीत होते.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com