युवतीला शिवीगाळ करणाऱ्या वकीलावर गुन्हा
पुणे, ता. ७ : इन्स्टाग्रामवर इतरांना फॉलो केल्याच्या रागातून आणि संशयातून स्वतःच्या कार्यालयात काम करणाऱ्या युवतीला स्टीलच्या बाटलीने मारहाण केल्याप्रकरणी पौड (ता. मुळशी) येथील ॲड. रितेश सुरेश ढोरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ढोरे फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ढोरेच्या कार्यालयात कामाला होती. ढोरे तिच्यावर संशय घेऊन तिला इतर मुलांशी बोलण्यास आणि सोशल मीडियावर इतरांना फॉलो करण्यास मज्जाव करत असे. या त्रासामुळे युवतीने काम सोडले होते, मात्र ढोरेने पुन्हा तिला कामावर बोलावले. शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ढोरेने युवतीला मोटारीत बसवून वळणे गावच्या दिशेने नेले. ''तू दुसऱ्यांशी बोललेले मला आवडत नाही'' असे म्हणत त्याने तिला शिवीगाळ केली आणि मोटारीतील स्टीलच्या बाटलीने तिच्या डोक्यात प्रहार केला. झटापटीत तिचे कपडे फाडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला रस्त्यात सोडून तो पसार झाला. पीडिताने कुटुंबीयांच्या मदतीने पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

