उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षपदी टिळेकर, उपाध्यक्षपदी वाघमोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षपदी टिळेकर, उपाध्यक्षपदी वाघमोडे
उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षपदी टिळेकर, उपाध्यक्षपदी वाघमोडे

उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षपदी टिळेकर, उपाध्यक्षपदी वाघमोडे

sakal_logo
By

राहू, ता. १९ : लडकतवाडी (ता. दौंड) येथील उत्कर्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शांताराम टिळेकर यांची, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय वाघमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक हर्षद तावरे यांनी दिली.

सर्वसामान्य सभासदांना केंद्रबिंदू मानून संस्थेचे कामकाज संगणकीकृत, पारदर्शकपणे सुरू आहे. भविष्यात सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन लाभांश वाटप करण्यावर अधिक भर राहणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष शांताराम टिळेकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय वाघमोडे यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.

याप्रसंगी लडकतवाडीचे उपसरपंच रवींद्र होले, सचिव विलास होले, बाबासाहेब जगधने, शीतल होले, दत्ता रासकर, लता बधे, रोहिदास लडकत, सदाशिव लडकत, विशाल बारवकर, रमेश लडकत, व्यवस्थापक दत्तात्रेय लडकत आदी उपस्थित होते.
-------------------

........................................................................