‘श्रीनाथ’तर्फे एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

‘श्रीनाथ’तर्फे एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

राहू, ता.२ : पाटेठाण (ता.दौंड) श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान कारखान्याशी निगडीत ५१ जोडप्यांच्या हस्ते ‘संकल्प महायज्ञ’ करण्यात आला.

कारखान्याने २०२३-२४ मध्ये ‘थोडेसे बदला एकरी १०० मे. टन ऊस उत्पादन मिळवा’ आडसाली एकरी १०० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. डीएस.टी.ए. मार्गदर्शनाखाली सुधारित ऊस विकास योजनांचा प्रभावीपणे वापर करून  नाना केरू वडघुले (टाकळी भीमा)  यांनी एकरी ११५ टन ऊस उत्पादन मिळविले या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मानाचा  “ऊस श्री” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर अलका शहाजी चोंधे  या भगिनीने खोडवा ऊस पिकामध्ये एकरी ७९ टन उत्पादन मिळविले त्याबद्दल त्यांना “ऊस लक्ष्मी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

एकरी शंभर टनांहून अधिक उत्पादन घेणारे शेतकरी : नाना केरू वडघुले (टाकळी भीमा) संतोष कुलाळ (वडगाव बांडे), राजेंद्र मेमाणे (वडगांव बांडे), श्वेताली कड (केडगाव),  ज्ञानेश्वर मगर (देवकरवाडी),  किसन शिंदे (राहू),  तानाजी मेमाणे (वडगाव बांडे),  दशरथ टेळे (टेळेवाडी),  राजेंद्र कदम (खुटबाव), सोमनाथ शिंदे (राहू),  अनिल जांभुळकर (लडकतवाडी),  आबासाहेब टेळे (टेळेवाडी),  अजय शितोळे (रांजणगांव सांडस),  प्रवीण जगताप (राहू),  सुनील कुंभार (रांजणगांव सांडस),  राहुल  अवचट (यवत स्टेशन) तानाजी हंबीर (पाटेठाण),दीपक ताम्हाणे (भरतगाव),  नागेश कोंडे (वढू खुर्द),. रमणलाल लुंकड (वडगाव रासाई),  अशोक डुकरे (वढू खुर्द)..
खोडवा ऊस पिकामध्ये ७५ टनांहून अधिक   ऊस उत्पादक शेतकरी : गणेश वायकर (पिंपरी सांडस, सुनीता थोरात (नाथाचीवाडी) यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. शेतकऱ्यांना डी.एस.टी.ए.चे शास्त्रज्ञ डॉ.सुरेश पवार, डॉ. चव्हाण व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ,एस.बी. टिळेकर, रोडे   यांनी मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे  यांचा कीर्तन सोहळा झाला.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास रासकर, श्रीसदगुरू शांतीनाथजी महाराज,बाळासाहेब चौगुले,  प्रताप महाराज चव्हाण, जयश्रीबोरावने, संभाजी गवारे,  कारखान्याचे संचालक माधव राऊत,महेश करपे,अनिल भुजबळ,  किसन शिंदे,  ज्ञानदेव कदम, लता सतीश केंद्रे,  अंकुशराव ढमढेरे,  रवींद्र भुजबळ,  भगवान मेमाणे,  हनुमंत शिवले,  लक्ष्मण कदम,  मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर , एस. बी . टिळेकर, यांच्यासह ऊस उत्पादक मान्यवर उपस्थित होते.
गणेश टेमगिरे यांनी सूत्रसंचालन तर कारखान्याचे उपाध्यक्ष योगेश ससाणे यांनी आभार मानले.

02410

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com