दौंडच्या पश्चिम पट्ट्यात भंडाऱ्याची मुक्त उधळण

दौंडच्या पश्चिम पट्ट्यात भंडाऱ्याची मुक्त उधळण

Published on

राहू, ता. २१ : दिवसभर कडाक्याचे ऊन, वाढलेला उकाडा, सायंकाळी सुमारास गारवा अशा वातावरणात सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्यात रविवारी (ता.२१) भाद्रपदी बैलपोळा पारंपरिक पद्धतीने भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत उत्साहात साजरा करण्यात आला.
राहू बेटपरिसरातील पिलाणवाडी, डुबेवाडी, टेळेवाडी, दहिटणे, मिरवडी, मेमाणवाडी, सांगवी सांडस, पाटेठाण, टाकळी भिमा, वडगाव बांडे, पानवली, कोरेगाव भिवर, वाळकी, पिंपळगाव, खामगाव, नांदूर, मिरवडी, सहजपूर, बोरीभडक, बोरीऐंदी, देलवडी, लडकतवाडी, उंडवडी, तांबेवाडी, खुटबाव आदी गावांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजर, डिजेचे भक्तीमय संगीत, गुलाल व भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत बैलपोळा सण साजरा केला. बैल जोडीने गावातील ग्रामदैवतांचे बैलजोडीने दर्शन घेतल्यानंतर घरी पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला.
बैलपोळ्यांच्या सजावटीच्या साहित्यांमध्ये यंदा सरासरी वीस टक्के दरवाढ झाली. गेल्या तीन वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी साहित्यांची विक्री झाली असल्याचे चंद्रभागा हार्डवेअरचे मालक प्रदीप जगताप, गणेश सोनवणे, महमद आतार, समीर आतार, मच्छिंद्र मेमाणे यांनी सांगितले. दरम्यान, आमदार राहुल कुल यांचे पुत्र आदित्य कुल यांची बैलजोडी आकर्षक ठरली.

परिसरात पाच हजारांहून अधिक मूर्तींची विक्री
दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये शाडूने बनवलेल्या बैल जोडीच्या पाच हजाराहून अधिक मूर्तींची विक्री झाली. यांत्रीकरणाच्या जमान्यात बैलजोडीची संख्या बोटावर मोजणी इतकीच राहिली आहे. पारंपरिक सणाचे महत्व म्हणून पूजा केली जाते. असे मूर्तिकार बापू कुंभार, गणेश कुंभार, स्वप्नील कुंभार, माणिक कुंभार, सचिन कुंभार, नितीन कुंभार यांनी सांगितले.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. बैलजोडी खरी शेतकऱ्यांची संपत्ती आहे. आमच्या घरी पण पिढीजात बैलजोडी आहे. बळीराजाचा सन्मान म्हणून बैलपोळा सण आम्ही दरवर्षी कुटुंबीय समवेत मोठ्या उत्साहात साजरा करतो.
- संजय सोनवणे/ सोमनाथ सोनवणे, राहू (ता. दौंड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com