रस्त्याचे वाजले तीन तेरा अन् नऊ बारा
राहू, ता. २६ : पिंपळगाव- खुटबाव- केडगाव (ता. दौंड) दरम्यान रस्त्याचे अक्षरशः तीन तेरा अन् नऊ बारा वाजले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा, असा प्रश्न नागरिक आणि वाहनचालकांना पडत आहे.
पिंपळगाव चौकातून खुटबावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे गेल्या एक वर्षापासून काम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. रस्त्यावरील खड्डे व धुळीमुळे येथील नागरिक त्रस्त असून, रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी पिंपळगाव, खुटबाव ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, या रस्त्यावर थोरातवस्ती आणि खुटबाव शाळेच्या चौकाजवळ धोकादायक खड्डे पडले आहेत. जड वाहतुकीमुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढू लागल्याने किरकोळ अपघातांची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्यावरून नेहमीच सतत जड वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यावरून सतत जड वाहतूक होत असल्याने रस्ता खचत आहे.
रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी धोकादायक विजेचे खांब वाकले आहेत. काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भविष्यात विजेचे खाबांचे व्यवस्थापन न केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मयूर सोनवणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पावसाच्या उघडिपीनंतर तातडीने रस्त्याची दुरुस्ती केली जाईल.
या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये- जा करतात. यापूर्वी अनेकदा अपघात झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरते रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी करावी. प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. संबंधित ठेकेदाराला सूचना करून रस्त्याच्या कामाला गती द्यावी.
- भाऊसाहेब ढमढेरे, ज्येष्ठ ग्रामस्थ, खुटबाव
धोकादायक खड्ड्यांमुळे चारचाकी गाड्यांचा खर्च वाढत आहे. रात्रीच्या वेळी दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधींच्या विकास कामांची फक्त वल्गना आहे. रस्त्याच्या कामाचा कुठेही दर्जा नाही. ठेकेदार आणि सब ठेकेदार पोसण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे.
- मच्छिंद्र मगर, संतप्त ग्रामस्थ.
03376
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.