पाटेठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी चोरमले

पाटेठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी चोरमले

Published on

राहू, ता. १२ : पाटेठाण (ता. दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी इंद्रभान चोरमले यांची तर उपाध्यक्षपदी सुंदरबाई घाडगे यांची बिनविरोध निवड झाली. विलास परांडे यांनी अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण केल्याने त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. यामध्ये चोरमले व घाडगे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती उपसहाय्यक निबंधक राहुल बोटखिंडे, संस्थेचे सचिव विक्रम मलगुंडे, सहसचिव रवींद्र मलगुंडे यांनी दिली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने कामकाज करून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष चोरमले व उपाध्यक्ष घाडगे यांनी सत्कार प्रसंगी सांगितले. यावेळी सरपंच उषा पिंपळे, उपसरपंच शांतीलाल दरवडे, संस्थेचे मार्गदर्शक विजय हंबीर, माजी उपसरपंच पाटील यादव, सुरेश हंबीर, अमोल हंबीर, रोहिदास हंबीर, बापूसाहेब हंबीर, दत्तात्रेय पिंपळे, देविदास हंबीर, अशोक वडघुले, अनिल पाबळे, विठ्ठल मांढरे यांसह सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com