दूरदृष्टीचा कणखर नेता

दूरदृष्टीचा कणखर नेता

Published on

दूरदृष्टीचा कणखर नेता

दूरदृष्टी ठेवणारा नेता म्हणून आमदार राहुलदादा कुल यांची ओळख संपूर्ण राज्याला आहे. दौंड तालुक्याचा त्यांनी सर्वांगीण विकास केला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी हजारो कोटींचा निधी आणला.

- डॉ. संदीप खेडेकर व डॉ. भारती खेडेकर
 
दौंड विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा(हॅटट्रिक) आमदारकी मिळून दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी  आमदार  राहुलदादा  कुल  यांचे नाव आवर्जून घेतले जाते. स्वर्गीय सुभाषअण्णा  कुल  यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवीत दादांनी ‘ना भूतो ना भविष्य’ असा सर्वांगीण विकास केला. यामध्ये  रस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्ते, तसेच सिंचन क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या मुळशी धरणाचे पाणी आणण्यासाठी आमदार राहुलदादा कुल यांनी मांडलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. या प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दुजारा दिल्यामुळे भविष्यात हे तालुके पूर्ण बागायती म्हणून ओळखले जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणला. सुमारे पन्नास कोटीहून अधिक निधी सर्वसामान्य रुग्णांसाठी दिले. मोफत उपचार करून दादांनी समाजसेवेचे वृत्त हाती घेतले.
शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून आमदार राहुलदादा कुल यांनी विधानसभेत आवाज उठवला. शेतीसाठी पाण्याची आवर्तने दिली. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एक समिती नेमण्यात आली. त्या समितीवर  आमदार  राहुलदादांना काम करण्याची संधी मिळाली.
स्वर्गीय सुभाषअण्णा  कुल  यांच्यासारखीच दूरदृष्टी ठेवणारा नेता म्हणजे राहुलदादा, अशी त्यांची ओळख संपूर्ण राज्याला आहे. दौंड तालुक्यातील पुनर्वसनबाबत दादांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर जवळ-जवळ  विषय सोडवले. वडगाव बांडे येथील लाभक्षेत्रात येत असल्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गुंजवणी प्रकल्पला देऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी विधानसभेत मांडली. या मागणीला न्यायालयीन पातळीवर यश मिळाल्याने सामान्य शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
अशा आमच्या लोकप्रिय दादांना  वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! तुम जियो हजारो साल... साल के दिन हो पचास हजार..!

(शब्दांकन- संतोष काळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com