राहूमध्ये संतराज महाराज पालखीचे स्वागत
राहू, ता. १३ : ज्ञानोबा माउली तुकारामांचा जयघोष, पारंपरिक वाद्य, भक्तिमय संगीताच्या तालावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रथाला केलेली फुलांची सजावट, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये वाळकी संगम (ता. दौंड) येथील संतराज महाराज पालखीचे (ता. १२) सायंकाळच्यावेळी राहू ग्रामस्थांच्या वतीने भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गुरुवारी (ता. १३) सकाळी सात वाजता पालखी सोहळ्याचे आळंदीच्या दिशेने प्रस्थान झाले.
पिलाणवाडी (ता. दौंड) येथे उद्योजक भगवानराव झरांडे, पहिलवान सुभाष झरांडे आणि परिवाराच्या वतीने पालखी सोहळा भोजनासाठी विसरला होता. पिलानवाडी, डुबेवाडी, देवकरवाडी फाटा येथे ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
पालखीचा पुढील मुक्काम बुरकेगाव (ता. हवेली) येथे होणार आहे. याप्रसंगी संतराज महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नामदेव महाराज साठे, भगवान झरांडे, बाबूराव कदम, सुभाष झरांडे, रामदास झरांडे, देविदास डुबे, बाळासाहेब डुबे, नारायण जगताप, विकास झरांडे, गणेश झरांडे, तानाजी चव्हाण, शिवाजी कुल, भानुदास चोरमले, मोहन चोरमले, लक्ष्मणराव कदम पाटील उपस्थित होते.

