चांडोली येथे १३ लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांडोली येथे १३ लाखांचा गुटखा जप्त
चांडोली येथे १३ लाखांचा गुटखा जप्त

चांडोली येथे १३ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. ५ : खेड पोलिसांनी कारवाई करत १३ लाखांचा गुटखा व टेम्पो कंटेनर मिळून २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल शुक्रवारी रात्री जप्त केला. तसेच दोन आरोपींना अटक केली.
शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांडोली येथे पुणे-नाशिक महामार्गावर भारत पेट्रोल पंपाच्यासमोर एक कंटेनर उभा असून त्यामध्ये गुटखा भरून आल्याची माहिती पोलिस अंमलदार सुनील बांडे यांना मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी लगेच सूत्रे हलविली. केंद्रे यांच्या सूचनेनुसार फौजदार भारत भोसले, ज्ञानेश्वर राऊत, पोलिस अंमलदार संतोष मोरे, निखिल गिरीगोसावी, अर्जुन गोडसे, कोमल सोनुने यांनी पंचांसह त्या ठिकाणी छापा घातला. त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक टाटा कंपनीचा टेम्पो उभा असलेला दिसला. त्यांना त्या टेम्पोमध्ये अर्जुन विठ्ठल नाईकडे (रा. बारापाटी, कमान, ता. खेड) व दीपक कोंडीभाऊ पाबळे (रा. राजगुरुनगर, ता. खेड) हे बसलेले आढळले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये एकूण १३ लाख ८२ हजार रुपये किमतीचा बेकायदा विक्रीसाठी आणलेला तंबाखू पान मसाला सापडला. तो कंटेनर व गुटखा हा पंचासमक्ष जप्त केला. संशयित आरोपींवर खेड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने संशयित आरोपींना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार ज्ञानेश्वर राऊत हे करत आहेत.