कर्तृत्ववान महिलेची प्रेरणादायी कहाणी
कर्तृत्ववान महिलेची प्रेरणादायी कहाणी
सौ. अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांचे सामाजिक कार्य फक्त नावापुरतं नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. या कामांमुळे गावागावांत त्यांची ओळख निर्माण झाली. विविध उपक्रमांमुळे समाजाशी त्यांची नाळ अजून घट्ट झाली आहे. त्यांचा आजवरचा प्रवास म्हणजे एका जिद्दी, कर्तृत्ववान आणि संवेदनशील महिलेची प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांच्या पाठीशी महिला वर्ग आहे, तरुणांचा उत्साह आहे, आणि जनतेचा विश्वास आहे.
खेड तालुक्याच्या राजकीय-सामाजिक आणि सहकार क्षेत्राच्या क्षितिजावर आज एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सौ. अश्विनीताई राजेंद्र पाचारणे. स्वतःच्या कष्टावर उभं राहिलेलं आयुष्य, समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ आणि सहकार क्षेत्रातून उभं राहिलेलं महिला नेतृत्व या सगळ्यामुळे आज त्यांनी प्रत्येक घराघरांत ओळख निर्माण केली आहे. अश्विनीताईंचा आजवरचा प्रवास म्हणजे एका जिद्दी, कर्तृत्ववान आणि संवेदनशील महिलेची प्रेरणादायी कहाणी आहे.
सौ. अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांनी सुरुवातीला उद्योजकतेत पाऊल टाकलं. आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण त्या मागे वळून न पाहणाऱ्या होत्या. मेहनत आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून त्यांनी पती राजेंद्र पाचारणे यांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय उभा केला आणि आज त्यांच्या उद्योगातून चारशे- पाचशे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. अनेक घरांना आधार देणं, गावातील तरुणांना काम देणं आणि महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणं हे त्यांचं खरं यश आहे.
राजगुरुनगर बँकेच्या उपाध्यक्ष
आपल्या तालुक्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं, हे मनात ठरवून त्यांनी सहकार क्षेत्रातही प्रवेश केला. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक महिलांना आणि तरुणांना उभारी दिली. बँकेच्या योजनांमधून अल्प व्याजदरात कर्ज देऊन महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी मदत केली. त्यांच्या या निःस्वार्थ कामामुळे समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण झालं. संचालकपदी निवडून आल्यानंतर त्यांच्या कामगिरीची दखल घेत संचालक मंडळाने नुकतीच बँकेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना दिली.
कामांमुळे गावागावांत ओळख
अश्विनीताईंचं सामाजिक कार्य फक्त नावापुरतं नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. राजगुरुनगरच्या २४ वाड्यांच्या दशक्रिया घाटाचा परिसर त्यांनी सुशोभित केला. भव्य महादेव मूर्ती स्थापित करून श्रद्धेचं वातावरण निर्माण केलं आणि या घाटावर येणाऱ्या शोकाकूल लोकांचं दुःख थोडं हलकं करावं, यासाठी मनापासून प्रयत्न केला. त्याच घाटावर गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून एक हजार लिटर क्षमतेचं सोलर सिस्टीम बसवून दिलं. अनेक गावांतील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून मदत केली. श्रद्धास्थानांची जपणूक व्हावी, भाविकांची सोय व्हावी म्हणून मंदिरांसमोर पत्र्याचे शेड आणि सभा मंडप उभारले. त्यांच्या या कामांमुळे गावागावांत त्यांची ओळख निर्माण झाली.
कैद्यांच्या आयुष्यात नवचैतन्य
अश्विनीताई यांनी आपल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांसाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवले. आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना मदतीचा हात दिला, नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन दिलं आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केलं. जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक कारागृहांमध्ये कैद्यांसाठी भजन स्पर्धांचं आयोजन करून अनेक कैद्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण केलं.
समाजाशी नाळ घट्ट
शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आधुनिक संगणक वाटले, शैक्षणिक साहित्य दिलं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. अनाथाश्रमातील मुलांसाठी त्यांनी केवळ साहित्यच दिलं नाही, तर वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. या सगळ्या कामांच्या जोडीला त्या नेहमी लोकांशी जोडलेल्या असतात. प्रत्येक सण, प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी लोकांच्या घराघरांत पोहोचतात. यंदाच्या दिवाळीत त्यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन दिवाळी सरंजामाचे वाटप केले. प्रत्येक घरातील दिवाळी गोड झाली पाहिजे, या भावनेतून केलेल्या या उपक्रमामुळे समाजाशी त्यांची नाळ अजून घट्ट झाली आहे.
अनेकांसाठी प्रेरणास्थान
सौ. अश्विनीताई पाचारणे या आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. उद्योजकतेपासून समाजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास सांगतो, मेहनत, प्रामाणिकपणा आणि लोकांसाठी असलेली तळमळ असेल, तर कोणतीही वाट अवघड नाही. ‘लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. सदैव समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध राहीन,’ असं त्या म्हणतात. म्हणूनच आज त्यांच्या पाठीशी महिला वर्ग आहे, तरुणांचा उत्साह आहे, आणि जनतेचा विश्वास आहे.
कामाचा उमटवणार ठसा
सौ. अश्विनीताई पाचारणे या आज खेड तालुक्यातील वाफगाव- रेटवडी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून या सेवेला पुढे नेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या आजवरच्या कामगिरीवरून हे स्पष्ट होतं की त्या केवळ महिला नेत्या नाहीत, तर एक संवेदनशील, कर्तृत्ववान आणि आश्वासक नेतृत्व आहेत. त्या केवळ नामधारी व्यक्ती नसून स्वयंभू आहेत. केवळ कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी त्या निवडणूक लढवीत नसून, प्रत्यक्ष काम करण्याची त्यांची क्षमता आहे. सामाजिक कामांतून आणि उद्योग व्यवसायांतून त्यांनी अनेकदा स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. राजगुरुनगर सहकारी बँक असो अथवा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान असो, त्या त्याठिकाणी हिरिरीने काम करताना दिसून येतात. जिल्हा परिषदेतही त्या त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील आणि त्यांच्या मतदारसंघाची समृद्धी आणि भरभराट करतील, असा लोकांना विश्वास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

