विहिरीत उडी मारून प्राध्यापकाची आत्महत्या
राजगुरुनगर, ता. २६ : येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापकाने मंदोशी (ता. खेड) येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. २६) उघडकीस आली. प्रा. डॉ. भानुदास मोतीलाल परदेशी (वय ५२, रा. शिवालय अपार्टमेंट, इंद्रायणी कॉलनी, मोशी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी महाविद्यालयीन कामकाजानंतर २४ डिसेंबरपासून बेपत्ता होते. महाविद्यालयातून ते दुचाकीवरून (क्र. एम एच-१४ एल के ३४०९) दुपारी तीनच्या सुमारास ते बाहेर पडले होते. ते घरी न पोचल्याने, तसेच त्यांचा फोनही लागत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तरीही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांच्या मुलाने खेड पोलिस ठाण्यात हरविल्याची खबर नोंदविली. त्यांचा शोध चालू असतानाच, खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मंदोशी गावापासून काही अंतरावर भैरवनाथ मंदिराजवळच्या विहिरीजवळ २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी एक दुचाकी, तिला अडकवलेली बॅग आणि चपला पुजाऱ्याला आढळून आल्या. मात्र बराच वेळ होऊनही कोणीच न दिसल्याने पुजाऱ्याने पोलिस पाटील आणि ग्रामस्थांना याची माहिती दिली. पोलिसांना कळविल्यानंतर प्रा. परदेशी यांची दुचाकी असल्याची खात्री पटली. पोलिस आणि कुटुंबीय आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह हाती लागला. त्यांची ओळख पटली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. सकाळी चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी धुळे जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
04163
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

