आदिवासी भागात जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न

आदिवासी भागात जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न
Published on

राजगुरूनगर, ता. १० : ‘‘खेड तालुक्याच्या आदिवासी भागात सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरुनगर येथे आदिवासी भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ,’’ असे आश्वासन आमदार बाबाजी काळे यांनी दिले.
खेड तालुका आदिवासी समाज बांधव आणि आदिवासी उत्सव समितीने विविध उपक्रमांनी राजगुरुनगरमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला. आदिवासी बांधवांनी राजगुरुनगरमधून बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची रॅली काढली. यावेळी आयोजित सभेत काळे बोलत होते.
वाडा रस्त्याने एसटी बसस्थानक ते चंद्रमा गार्डनपर्यंत या रॅलीचे आयोजन केले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, अतुल देशमुख, कैलास सांडभोर आदी यावेळी उपस्थित होते. पारंपरिक वाद्य आणि ध्वनिवर्धकाच्या निनादात आदिवासी बांधव रॅलीत सहभागी झाले होते. अनेकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. रॅलीपुढे पारंपरिक नृत्यांचे फेर धरले होते.
चंद्रमा गार्डन येथे रॅलीची सांगता सभेने झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप बांबळे होते. याप्रसंगी आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, विजयसिंह शिंदे, बाजार समिती सदस्य विठ्ठल वनघरे, सुधीर भोमाळे, पंचायत समिती सदस्य दिनेश हांडे, मनीषा हिले, नगरसेविका कल्पना आढारी, संतोष भांगे आदी उपस्थित होते.
यावेळी शिवव्याख्याते प्रा. संपत गारगोटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
आमदार काळे म्हणाले, ‘‘आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची आगामी काळात काळजी घेतली जाईल. शासन पातळीवर आदिवासी भागाच्या विकासाला चालना दिली जाईल. आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. आदिवासी भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच खेड तालुक्यातून भोरगिरी वरून भिमाशंकर येथे जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’
सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी केले. राहुल आढारी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com