यंदा ५०० हेक्टरच आडसाली उसाची नोंद

यंदा ५०० हेक्टरच आडसाली उसाची नोंद

राजेगाव, ता. ३ : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव परिसरात बुधवारपर्यंत (ता. ३) फक्त ५०० हेक्टर आडसाली उसाची नोंद झाल्याची माहिती येथील भीमा-पाटस, दौंड शुगर आणि बारामती अॕग्रो आणि गौरी शुगर या साखर कारखान्यांच्या राजेगाव येथील गट ऑफिसमध्ये मिळाली. यामध्ये को-८६०३२ व को-एम ०२६५ या जातींच्या उसाची नोंद झाली आहे.
यंदा राजेगाव परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वळवाचा पाऊस पडला. तेव्हापासून आजअखेर वरचेवर पाऊस बरसतोय. शिवाय २३ मेला कोरड्या पडलेल्या भीमा नदीपात्रात पाणी आल्याने उजनी पाणीपातळी समाधानकारक वाढली असली तरी वरचेवर होत असलेल्या पावसामुळे लागवडीसाठी योग्य वापसा नसल्याने लागवडी लांबत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
राजेगाव गट कार्यालयात राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव, मलठण व स्वामी चिंचोली या गावांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे ऊसलागवड धोरणांनुसार भीमा पाटस आणि गौरी शुगर हिरडगाव या दोन कारखान्यांनी एक जूनपासून तर दौंड शुगर आणि बारामती अॕग्रो या दोन कारखान्यांनी १ जुलै ते ३१ ऑगस्ट हा हंगाम आडसाली उसाची लागवड कालावधी जाहीर केला आहे.

पहिल्याच दिवशी जर उसाची नोंद झाली, तर पुढील वर्षी कारखाने सुरू झाल्याबरोबर लगेचच ऊसतोड मिळते. शिवाय आडसाली उसाचे उत्पादनही चांगले मिळते, अशी माहिती खानवटे येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र झोंड यांनी दिली.

दौंड शुगर या कारखान्याच्या राजेगाव येथील गट कार्यालयात झाली. पहिल्याच दिवशी फक्त ६० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आडसाली दि. १ जुलै ते दि. ३१ आॕगस्ट ६०० हेक्टर, पूर्वहंगाम ता.. १/९ ते ता.. ३०/११ दरम्यान एकूण ३० हेक्टर आणि सुरू हंगामात ता.. १/१२ ते ता.. २८/२ दरम्यान ७ हेक्टर नोंद झाली होती. दौंड शुगरच्या राजेगाव गट कार्यालयाचे अॕग्री सुपरवायझर गणेश जाधव यांनी दिली.

गौरी शुगर हिरडगाव येथील कारखान्याने एक जूनपासूनच आडसाली ऊस लागवड करण्यास परवानगी दिली असून, राजेगाव गटात आत्तापर्यंत २७० हेक्टर नोंद झाली आहे. गेल्या वर्षी दौंडच्या पूर्व भागात एकूण १०४० हेक्टर उसाची नोंदी पैकी ५४० हेक्टर आडसाली उसाची नोंद झाली होती.
- महेश जाधव, गौरी शुगर कारखाना

भीमा पाटस कारखान्याने एक जूनपासून आडसाली ऊस लागवडीला परवानगी दिली असून, आतापर्यंत १०३ हेक्टर आडसाली उसाची नोंद झाली आहे. गतवर्षी राजेगाव गटात ६०० हेक्टर उसाची नोंद झाली होती.
-दत्ता शितोळे, गटप्रमुख, भीमा पाटस कारखाना

बारामती ॲग्रो कारखान्याच्या राजेगाव गटात १ तारखेला फक्त ४५ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. गतवर्षी एकूण ४०० हेक्टर आडसाली, २० हेक्टर पूर्वहंगामी आणि ११ हेक्टर सुरू हंगामात नोंद झाल्याची आहे.
- गणेश काळे, अॕग्री सुपरवायझर

00206

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com