Tue, March 28, 2023

लक्ष्मीबाई शिवले यांचे निधन
लक्ष्मीबाई शिवले यांचे निधन
Published on : 1 March 2023, 11:24 am
रांजणगाव सांडस, ता.१ : शिवतक्रार म्हाळुंगी-पारोडी (ता.शिरूर) येथील वारकरी संप्रदायातील लक्ष्मीबाई हरिभाऊ शिवले (वय १०१) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वीस वर्षे त्यांनी पंढरीची पायी वारी करून मुलाला लष्करामध्ये देश सेवेस जाण्यात प्रवृत्त केले. सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच रामचंद्र शिवले, अमृत सहकारी दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष मेजर लक्ष्मण शिवले हे त्यांचे पुत्र होय. तर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विकास शिवले यांच्या त्या आजी होय.
01997