शिर्डी ः- सकाळ विशेष बातमी....

शिर्डी ः- सकाळ विशेष बातमी....

Published on

अमित शहांचा पासपोर्ट फोटो वापरावा

अमित शहांचे आज दोन मेळावे
सहकारी साखर कारखानदारीपुढील समस्यांबाबतीतील भूमिकेकडे लक्ष

सतीश वैजापूरकर
सकाळ वृत्तसेवा
शिर्डी, ता. ४ ः केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. ५) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत लोणी आणि कोपरगाव येथे दोन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष असलेले शहा या मेळाव्यात सहकारी साखर कारखानदारीपुढील समस्यांबाबत नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे या क्षेत्रातील धुरिणांचे लक्ष लागून राहिले आहे.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून शहा यांच्या उपस्थितीत देशातील पहिली सहकारी साखर परिषद संपन्न झाली. त्यानंतर शहा यांनी सहकारी साखर कारखान्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबीत पडलेला आयकर माफीची प्रश्न मार्गी लावला. बारा हजार कोटी रुपयांचा आयकर कागदोपत्री माफ झाला. आता या दौऱ्यात सहकार क्षेत्रासाठी कुठली घोषणा करतात, युवानेते विवेक कोल्हे यांच्या पुढाकारातून कोल्हे कारखान्याने उभारलेल्या सीएनजी प्रकल्पाच्या उद्‍घाटनाच्या निमित्ताने शहा उपपदार्थ निर्मितीबाबत काय भूमिका मांडतात ? याबाबत उत्सुकता आहे.
एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीचा गड, अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात सहकारातील धुरीणांनीच खासगी साखर कारखानदारीकडे आपला मोर्चा वळवला. पंचवीस वर्षांपूर्वी बोटांवर मोजण्याइतके खासगी कारखाने असलेल्या महाराष्ट्रात आता ९९ सहकारी आणि १०१ खासगी कारखाने आहेत. सहकारी कारखाने बंद पाडून ते मोडीच्या भावात विकत घ्यायचे. खासगी मालकी प्रस्थापित करून ते चालवायचे, या सहकाराला नख लावणाऱ्या उद्योगाची चलती महाराष्ट्राने पाहिली. त्याचा परिणाम म्हणून सहकाराच्या बरोबरीने खासगी कारखान्यांचे पीक आले. विशेष म्हणजे आजही काही सहकारी साखर कारखाने उसाला चांगला भाव देतात. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन अपवाद खासगी कारखान्यांना त्यानुसार भाव द्यावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी खासगी साखर कारखान्यांच्या मालकांनी उत्पादकांचे शोषण केल्याचा काळ विस्मृतीत गेलेला नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना त्यादृष्टीने देखील महत्त्व आहे.
यंदा बाजारपेठेत साखरेला ३६ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सरकारी दर मात्र ३१ रुपये प्रतिकिलो एवढाच आहे. एफआरपी नुसार साखरेच्या दरात वाढ व्हावी, ही सर्वाधिक महत्वाची मागणी आहे.

इन्फो
...
आपदग्रस्तांना मदतीची घोषणा ?
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात आणि युवानेते विवेक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली वाटचाल करीत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कोल्हे कारखान्यावर सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावे होत आहेत. हे दोन्ही तालुके अतिवृष्टीग्रस्त आहेत. राज्यातील आपदग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी ठोस घोषणा होईल का, याकडे राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com