
धारातीर्थ गडकोट मोहिमेत ४० हजार धारकरी
शिनोली, ता. ३१ : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर ते किल्ले शिवनेरी अशी श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानतर्फे धारातीर्थ गडकोट मोहीम आयोजित केली होती.. संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत त्यास सुरुवात झाली. यात सुमारे ३५ ते ४० हजार धारकरींनी सहभाग घेतला.
मोहिमेसाठी शनिवारी (ता.२८) सकाळपासूनच शिवप्रतिष्ठानचे धारकरी भीमाशंकरकडे येण्यास सुरुवात झाली. एकाच वेळी प्रचंड गर्दी झाल्यामुळे भीमाशंकरमध्ये पोलिस प्रशासनावरही मोठा ताण आला. भीमाशंकरमध्ये रविवारी पहाटे सहा वाजता आरती करून सांगली, सातारा, कोल्हापूर व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या धारकऱ्यांनी शिवनेरीच्या दिशेने जंगलातून पायी वाटचाल करण्यास सुरुवात झाली. भीमाशंकरवरुन कोंढवळ मार्गी भट्टी ह्या जंगलातून वीस ते पंचवीस कि..मी. असणाऱ्या आहुपे येथे त्यांचा पहिला मुक्काम आहे. दुसरा मुक्काम वरसुबाई सुकाळ वेढे येथे असून तिसरा मुक्काम किल्ले शिवनेरीवर झाला. दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांचे भीमाशंकरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.
00188