दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढा
दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढा

दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढा

sakal_logo
By

शिनोली: १६: ''''श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री यात्रेपूर्वी दुकानदारांनी रस्त्याशेजारी केलेली अतिक्रमण स्वतःहून काढावीत. अन्यथा प्रशासन अतिक्रमणे काढून टाकेल'''' असा इशारा तहसीलदार रमा जोशी यांनी दिला आहे.

भीमाशंकर महाशिवरात्री यात्रा नियोजनासाठी तहसीलदार जोशी यांनी सर्व खाते प्रमुखांचा पाहणी दौरा व बैठक भीमाशंकरमध्ये आयोजित केली होती. भीमाशंकर मधील बस स्थानकापासून तर मंदिरापर्यंत वाटेने दुकानदारांनी रस्त्यावर आपले दुकानात थाटली आहेत. त्यामुळे मंदिराकडे जाताना भाविकांना याचा त्रास होतो. अतिक्रमणांमुळे एखादी दुर्घटना देखील शकते म्हणून महाशिवरात्री यात्रेपूर्वी प्रत्येक दुकानदाराने आपले रस्त्यावर केलेल्या अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावे अन्यथा सर्व यंत्रणा लावून पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमण काढली जातील असा इशारा रमा जोशी यांनी सर्व दुकानदारांना बोलून बैठकीमध्ये दिला. देवस्थानच्या वतीने दर्शन बारी मंदिराची सजावट मंदिराबाहेर मांडव पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून बाकी तयारी सुरू असल्याचे यावेळी विश्वस्त रत्नाकर कोडीलकर सांगितले.
दरम्यान, मंचर ते भीमाशंकर रस्त्यावर आवश्यकता ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे यावेळी उपअभियंता सुरेश पटाडे यांनी सांगितले.

बैठकीस भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रेय कौदरे, प्रसाद गवांदे तसेच उप अभियंता सुरेश पटाडे, शैलेश गीते, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, डॉ.पवार, गौरव काळे हे सहभागी झाले होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भाविक जुन्या पायरी मार्गानेच मंदिराकडे दर्शनासाठी जातील. या पायरी मार्गाचे सुरू असलेले काम थांबवून, पुन्हा रस्ता सुरू करण्यात आला आहे.
- रमा जोशी, तहसीलदार

00197