सावित्रीच्या लेकींनी चालविले पाटील स्कूलचे कामकाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीच्या लेकींनी चालविले
पाटील स्कूलचे कामकाज
सावित्रीच्या लेकींनी चालविले पाटील स्कूलचे कामकाज

सावित्रीच्या लेकींनी चालविले पाटील स्कूलचे कामकाज

sakal_logo
By

इंदापूर, ता. ८ ः येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता नववी व दहावीच्या मुलींनी प्रत्यक्ष शालेय व कार्यालयीन कामकाज सांभाळत एक वेगळा कृतीयुक्त अनुभव देऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा केला.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शैलेश दरेकर व सावित्रीबाईंच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी साक्षी काळे हिने ''मी सावित्री बोलते...'' या विषयावर एकपात्री नाटक सादर करून, सावित्रीबाईंचे चरित्र विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर शाळेची विद्यार्थिनी प्राचार्य सृष्टी भिसे व सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून ऋतुजा गलांडे त्यांच्यासोबत चोवीस विद्यार्थिनींनी शिक्षिका म्हणून अतिशय उत्तमरीत्या शाळेचा कारभार सांभाळून सावित्रीच्या लेकी म्हणून स्वतःला सिद्ध केले.

यावेळी बोलताना प्राचार्य शैलेश दरेकर म्हणाले, ‘‘सावित्रीच्या लेकींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी ज्ञानाची गरज तर आहेच, पण त्यासोबत शारीरिक ताकद, निर्णय क्षमता, आत्मनिर्भरता हे गुण मुलींनी अंगी रुजवले पाहिजे.’’
-----------------------