शेतीच्या वादावरून दांपत्याला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीच्या वादावरून 
दांपत्याला मारहाण
शेतीच्या वादावरून दांपत्याला मारहाण

शेतीच्या वादावरून दांपत्याला मारहाण

sakal_logo
By

इंदापूर, ता. १४ : अवसरी (ता. इंदापूर) येथील एका दांपत्याला शेतीच्या वादावरून मारहाण करण्यात आली. याबाबत सहा जणांवर इंदापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
अवसरी येथील संध्या शिवाजी पेंडवळे व शिवाजी विष्णू पेंडवळे यांना शेजारील असलेल्या शेतकऱ्याकडून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. याबाबत संध्या शिवाजी पेंडवळे यांनी फिर्याद दिलेल्या फिर्यादीवरून ११ जानेवारी रोजी दुपारी शिवाजी विष्णू पेंडवळे व त्यांची पत्नी संध्या शिवाजी पेडवळे हे खूरपण करत असताना शेजारील शेतकरी राजेंद्र सोपान पेंडवळे, धनाजी राजेंद्र पेंडवळे, ऊर्मिला राजेंद्र पेंडवळे, अनुसया धनाजी पेंडवळे (सर्वजण रा. अवसरी, ता. इंदापूर) व त्यांचे नातेवाईक अक्षय महादेव खबाले, अजय महादेव खबाले (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) यांनी मारहाण केली.