इंदापुरात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
इंदापुरात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

इंदापुरात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

इंदापूर, ता.१५ : मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बस चालकाविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत इंदापूर आगाराचे व्यवस्थापक मेहबूब मणेर यांनी शनिवारी (ता.१४) ही तक्रार दाखल केली. सटवा कचरु बनसोडे (रा. वपरगाव, ता. केज, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या बसचालकाचे नाव आहे. तो शनिवारी मध्यरात्री धारूर आगाराची बस घेऊन पुण्याहून धारूरला निघाला होता. पहाटे पुण्याहून धारूरला निघालेल्या बसमधील प्रवाशांनी इंदापूरमध्ये स्थानकावर बस आल्यानंतर बसमधील सत्यजित लोखंडे आणि युवराज ओथंबिरे या प्रवाशांनी याबाबत इंदापूर बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रकाकडे चालकाने दारू प्राशन केल्याची शंका उपस्थित केली. यानंतर आगार व्यवस्थापक मणेर यांच्या तपासणीअंती चालक मद्यावस्थेत आढळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ बसला पर्यायी चालक देऊन ही बस धारूरकडे रवाना केली.