विभागीय कराटे स्पर्धेसाठी बारामतीच्या शांतनूची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागीय कराटे स्पर्धेसाठी
बारामतीच्या शांतनूची निवड
विभागीय कराटे स्पर्धेसाठी बारामतीच्या शांतनूची निवड

विभागीय कराटे स्पर्धेसाठी बारामतीच्या शांतनूची निवड

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. १७ : बारामती येथील क्रीडा संकुलात शुक्रवारी (ता. १३) पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटातील, ६४ ते ६८ वजन गटामध्ये अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज संग्रामनगर, कटफळ मधील इयत्ता ११ वी तील शांतनू लाला जाधव याने प्रथम क्रमांक मिळविल्याने त्याची शालेय विभागीय स्तरावर कराटे स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या वेळी संस्थेच्या सचिव संगीता मोकाशी, मुख्याध्यापक प्रशांत वणवे तसेच गीता भंडलकर, वृषाली शेळके यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शांतनूला या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक मनोज मदने यांचे मार्गदर्शन लाभले होते.