
नारायणदास रामदास शाळेतील ६०५ विद्यार्थी सहभागी
इंदापूर, ता. २२ : इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी कोवळ्या उन्हात बालकांनी सकाळ माध्यम समूह आयोजित सकाळ बाल चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चार गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ६०५ विद्यार्थांनी भाग घेतला. स्पर्धेचे नियोजन प्राचार्य विकास फलफले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक अशोक भोईटे, पर्यवेक्षक दादासाहेब जावीर, सुनंदा वाघमारे, जयसिंग शिंगाडे, चित्रकला शिक्षक वंदना शिर्के, यशवंत केवारे, अण्णासाहेब खटके, पुष्पा बोंगाणे, शिक्षकेतर कर्मचारी माधव शिंदे, पंकज कांबळे, सुहास जगताप, राघू शिंदे यांनी प्रयत्न केले.
या केंद्रावर शहरातील सौ. कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालय, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, शहर व परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डॉ. कदम गुरुकुल इंदापूर, प्रियदर्शिनी इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, श्री. आर. के. शहा विद्यालय इंदापूर येथील विद्यार्थीही सहभागी झाले होते. ‘सकाळ’चे इंदापूर वितरण प्रतिनिधी भीमाशंकर जाधव यांनी पर्यवेक्षणाचे काम केले.
स्पर्धेत चित्र रेखाटताना खूप आनंद मिळतो. आम्ही दरवर्षी मोठ्या उत्सुकतेने चित्रकला स्पर्धेची वाट पाहत असतो. स्पर्धेमुळे आम्हा विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव मिळतो. ‘सकाळ’चा हा उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी आहे.
- गायत्री आटोळे, सहभागी विद्यार्थिनी