
शहा येथे भरला विद्यार्थ्यांचा आठवडे बाजार
इंदापूर, ता. ३० : शहा (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्यावतीने भरविलेल्या आठवडे बाजारामध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते.
यानिमित्ताने शहा परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला तालुक्याच्या बाजारात न पाठवता थेट शाळेत भरवलेल्या बाजारात विकण्याला आणल्यामुळे शाळेच्या आवारातच आठवडी बाजार भरला होता. गावकऱ्यांनी या आठवड्या बाजाराला गर्दी केली होती. या बाजारात विविध पालेभाज्या, फळे, भजी, वडापाव, चहा, किराणा मालाचे दुकान आणि महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने आदी दालने भरविली होती.
यावेळी शहा ग्रामपंचायचे माजी उपसरपंच दिलीप पाटील, शिवाजी शिंदे, तानाजी गंगावणे, अशोक पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन निकम, किशोर धाईंजे, सुरज धाईंजे, दत्तात्रेय पाटील, शरद भोई, संतोष पाटील, राहुल सूर्यवंशी, महादेव लांडगे, मोहन गंगावणे, दादा जाधव, सूर्यभान निकम यांसह गावातील महिला तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामचंद्र कांबळे, परमेश्वर खंदारे, जाई कोळेकर, गणेश मोरे आदी उपस्थित होते.